प्रेरणा

श्री दिनेश कृष्णराव रंधवे (राजाभाऊ चोपदार)
वारी सोहोळ्याचा यथार्थ आणि प्रमाण तपशील सर्व भाविकांना विदित व्हावा, अशी अंत:करणापासून तीव्र इच्छा होती. त्या इच्छेला आपण वागयज्ञाची जोड पुरविलीत त्यामुळेच तो संकल्प या ठिकाणी सिद्धीस जातो आहे. ही कृपा जितकी श्री माऊलींची तितकीच तुमचीही.....

वारक–यांच्या लेखी वारी हा निखळ श्रद्धेचा प्रांत. परंतु जीवनात श्रद्धेला जोड लागते शिस्तीची आणि व्यवस्थापनाची. श्री माऊलींचे चोपदार या नात्याने त्या व्यवस्थापन यज्ञाची धुरा आपण सांभाळत आहात.

‘चोपदार’ या पदाचे माहात्म्य मनावर बिंबते ते आपल्याकडे बघितले की...

निर्मितीसाहाय्य

स्वप्नील कापसीकर

संकल्पना, संयोजन आणि कार्यवाही

www.warisantanchi.com

सूचना व प्रतिक्रियांसाठी संपर्क: info@warisantanchi.com

श्री. अभय टिळक


श्री राजाभाऊंचे शब्दबद्ध कथन ‘वेब’वारीच्या वारकर्‍यांपर्यंत संपादित स्वरुपात पोहोचले तुमच्यामुळे ....

सौ. ज्योती टिळक


.... आणि लोकभाषा मराठीतील ‘वेब’वारी ग्लोबल झाली ती तुम्ही केलेल्या तिच्या इंग्रजी अनुवादामुळे.

‘साकू’ –प्रज्ञेश शैलजा ज्ञानेश्वर मोळक


‘वेब’वारीच्या वारकर्‍यांना ‘याची देही याची डोळा’ पायीसोहोळा अनुभवता आला तो वारकरी बनून वाटचाल करताना तुझ्या कॅमे-यातून तू संवेदनशीलतेने टिपलेल्या सोहोळ्याच्या जिवंत क्षणांमुळे...

श्री.अजय आवारे


‘वेब’वारीची वाटचाल मुक्कामापर्यंत सुरळीत झाली ती तुझ्या धावपळीमुळेच...

प्रवर्तन - वारकरी सेवा संघ

श्री दिनेश रंधवे (राजाभाऊ चोपदार)-अध्यक्ष, 
अॅड. माधवी निगडे –सचिव,  
श्री भरत शेरला- खजिनदार,
श्री चैतन्य लोंढे- विश्वस्त, 
श्री हेमंत निखळ- विश्वस्त, 
डॉ. भगवान नारखेडे –आरोग्य प्रकल्प प्रमुख

 

मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता


ह.भ.प.श्री जयसिंगराव मोरे, 
श्री विश्वनाथ गरुड, 
श्री संतोष कोंढेकर.