वारीची संकल्पना

‘यात्रा’ आणि ‘वारी’ यात मुख्य फरक म्हणजे यात्रेला ठराविक कालावधी निश्चित नसतो. ती एकेकट्याने करता येते आणि ती पण विशिष्ठ हेतु-निबदध असते. पण वारी ही निरपेक्षपणे, आयुष्यभराचेच नव्हे: तर वंशाचे व्रत म्हणून अखंडपणे चालवली जाते. वारी ही अखंड चालणारी असून निष्काम कर्मयोगाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.वारी ही संकल्पना पूर्णत: वेगळी आहे. श्रीपांडुरंग हे एकमेव दैवत, चंद्रभागा हे तीर्थ आणि पढरी हे क्षेत्र या पलीकडे..

पुढे वाचा

वारीची वैशिष्ट्ये

वारी सोहळा हा माऊलीचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाउस, वारा याची तमा न बाळगाता वारीत चालत राहतो कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली... काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुदधा घालत नाहीत काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो तो या वारीतच!..

पुढे वाचा

वारीची परंपरा

वारीची परंपरा ही श्री माऊलीच्याही पूर्वीपासून चालत आलेली आहे. श्री माऊलींचे पणजोबा श्री त्र्यंबकपंत कुलकर्णी हेसुद्धा आपेगाव ते पंढरपूर वारी करत. श्री माऊली, श्री नामदेवमहाराज, श्री सांवतामाळी, श्री चोखोबा, श्री तुकाराम महाराज आदी सर्व संतांची मांदियाळी त्यांच्या काळात पंढरीच्या पांडुरंगाची वारी करीत असे. किंबहुना, ज्या भागवत-धर्माची मुहूर्तमेढ श्री संतांनी रोवली त्याचा विस्तार करण्यासाठी त्यांचे एकत्र भेटण्याचे ठिकाण व समय म्हणजे पंढरीची आषाढ शुद्ध एकादशीची वारी असेच म्हणावे लागेल.

पुढे वाचा
Warisantanchi